सफाळे येथील मराठा बेकरी चोरी प्रकरणातील दोन फरार आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात सफाळे पोलिसांना यश

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील मराठा बेकरी मध्ये चोरी करून फरार झालेल्या दोन आरोपींना मुद्देमाला सह जेरबंद करण्यात सफाळे पोलिसांना यश आले आहे.
सफाळे पूर्व येथील मराठा बेकरीमध्ये 13 जुलै 2023 रोजी पहाटेच्या सुमारास बेकरीचे शटर तोडून अज्ञात चोरांनी या बेकरी मधील 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून पलायन केले होते. या बाबतचा त्यांचा चोरी करतानाचा व्हिडिओ सफाळे येथील लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला होता. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बेकरीच्या दुकानाचे शटर तोडत असताना धोनी पाजी बच्चन सिंग सोडी वय वर्ष (20) राहणार बोईसर आझाद नगर व जयसिंग दत्तू राठोड वय वर्ष (21) राहणार आनंदी नगर बोईसर या दोघांचे फोटो कैद असल्यामुळे या दोन्ही आरोपींना बोईसर येथील त्यांच्या राहत्या घरातून शनिवार दिनांक 15 जुलै 2023 रोजी अटक करण्यात आले असून त्यांना रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी पालघर कोर्टात हजर केले असता पालघर कोर्टाने त्यांना 28 जुलै 2023 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा यशस्वी तपास सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सुळे, पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील, पोलीस हवालदार कैलास शेळके, पोलीस हवालदार महेंद्र शर्मा, सहाय्यक फौजदार भोये,पोलीस नाईक भावर, पोलीस नाईक डोंगरे, ठाणे अंमलदार जे.जे. दवणे, पोलीस हवालदार केणी, पोलीस शिपाई चिमकर या पथकाने लावला असून सफाळे भागातील तमाम नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्ह्यात राबवलेल्या जनसंवाद अभियाना अंतर्गत सफाळे पोलीस ठाणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात, गल्ली,गावात, सोसायटीमध्ये, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावून पोलिसांना सहकार्य करावे.



