महाराष्ट्र

सफाळे टेंभीखोडावे येथील आधार फाउंडेशन संस्थेचे उद्घाटन करताना पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

सफाळे भागातील गोरगरिबांच्या मदतीसाठी एक मदतीचा हात म्हणून ग्रामीण भागातील टेंभीखोडावे सारख्या गावात आधार फाउंडेशन संस्था उभारण्याचे काम या गावातील तरुणांनी केले आहे.या आधार फाउंडेशन संस्थेचे उद्घाटन पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ यांच्या हस्ते बुधवारी पार पडले

यावेळी केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, आधार फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनेश गावड, कार्याध्यक्ष बलवंत पाटील, आणि टेंभीखोडावे सरपंच सौ. शोभा कमलाकर पाटील, जलसार सरपंच सौ.साक्षी गजानन गावड, कांद्रेभुरे सरपंच सौ. शिल्पा म्हसकर, विराथन बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच सौ. अंजली किणी , मांडे- विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पाटील, वेढी ग्रामपंचायत सरपंच नचिकेत पाटील, अशा पंचकोशीतील सरपंचांसह, उपसरपंच, सदस्य महादेव गावड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ यांना संस्थेचे कार्य, आणि समाजकार्याचे महत्व पटवून देऊन पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ यांनी मार्गदर्शन करून लहान मुलांनी मोबाईलचा वापर कसा करावा तसेच पालकांनी मुलांकडे कसे लक्ष द्यावे याबद्दल माहिती दिली.
तर केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी आधार फाउंडेशन सारख्या संस्था प्रत्येक गावात तरुणांनी उभ्या कराव्यात असे तरुणांना आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button