पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते विद्यालयाच्या शिक्षकांच्या सेवापुर्ती निमीत्त सत्कार संपन्न

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123
पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या तीन शिक्षकांच्या सेवापुर्ती तसेच नुतन मुख्याध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
पिंपरी बुद्रुक येथील पंचक्रोशी प्रतिष्ठान संचलित लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणात सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षा सुभद्राबाई महादेव बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके, ॲड समाधान बोडके, सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, लालासाहेब बोडके, बबन बोडके, प्रभाकर बोडके, हिरालाल सुळे, अशोक बोडके, बाळासाहेब घाडगे, सुदर्शन बोडके आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप तुकाराम पाडूळे यांची ३२ वर्ष सेवा, अरूण यशवंत सुर्यवंशी २७ वर्ष सेवा, रामचंद्र नारायण शेंडगे २८ वर्ष सेवेनंतर निवृत्त झाले. तसेच पर्यवेक्षक भारत परमानंद कोरटकर यांची नुतन मुख्याध्यापक म्हणून निवड करण्यात आले बद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत बोडके यांनी सुत्रसंचलन लवटे सर यांनी तर आभार पोळ सर यांनी मानले.



