महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अकलूज येथील विकास कामांसाठी 70 लाखाचा निधी मंजूर

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

राष्ट्रवादीचे नेते व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून तसेच अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद यांच्या मागणीनुसार ,महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अकलूज नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी 70 लाखाचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी दिली असून या 70

लाख निधी मधून अकलूज नगर परिषद हद्दीतील अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर धनश्री नगर एमआयडीसी येथे तालीम बांधणे, करता (10-लाख रु.)-अकलूज येथील मुस्लिम समाज दफनभूमीची उर्वरित संरक्षण भिंत बांधणे करिता ( 10लाख रु)-रमामाचा चौक येथे लक्ष्मी माता मंदिर शेजारील जागेत सभा मंडप बांधणे ( 10 लाख रु) — वडार गल्ली येथे वडार समाज मंदिर बांधणे करता (10 लाख रु.)–

रामायण चौक ते शिवाजी तालीम गुरुनगर पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (वार्ड क्रमांक 3) ( 10 लाख रु.) हंसाजीराव देशमुख वाडा ते चाळी इमारतीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (वार्ड क्रमांक .4) ( 10 लाख रु.)जाधव वस्ती ते टिळेकर वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (वार्ड क्रमांक 13) 10 लाख रु.) असे विकास कामांसाठी निधी मंजूर झाला असून

यापूर्वी अकलूज दफनभूमी वॉल कंपाऊंड साठी राज्याचे माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या निधीतून 25 लाख रुपये मंजूर होऊन जवळपास हे काम पूर्णत्वाकडे आले आहे आणखी यात शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दहा लाख रुपये मंजूर झाल्याने समाजाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button