फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नसल्यामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात गुळसडी येथील तरुण चार डिसेंबर पासून आमरण उपोषण करणार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील तरुण सुनील गणपत भोसले हे पोलीस प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात येत्या 4 डिसेंबर 2023 सोमवारी करमाळा तहसील कचेरीच्या प्रांगणात फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नसल्याच्या कारणामुळे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती श्री भोसले यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाच्या प्रती श्री भोसले यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवले आहेतजिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवलेल्या
निवेदनात श्री भोसले यांनी पुढे असे म्हटले आहे की मी करमाळा तालुक्यातील मौजे गुळसडी येथील कायमचा रहिवासी असून मौजे पिंपळवाडी तालुका करमाळा येथील राजेंद्र सोपान चव्हाण, सौ कुसुम राजेंद्र चव्हाण, तसेच सिद्धार्थ राजेंद्र चव्हाण, राहुल रामदास कांबळे व आजिनाथ सिताराम चव्हाण या सर्वांनी मिळून माझा विवाह करीना राजेंद्र चव्हाण हिच्याशी करून दिला होता मात्र करीना राजेंद्र चव्हाण हिचे पूर्वीच विवाह झाला होता सदर पहिल्या विवाहाची माहिती
माझ्यापासून लपवून ठेवून माझ्याकडून विवाहासाठी तीन लाख रुपये घेऊन माझी फसवणूक उपरोक्त लोकांनी केली आहे त्याबाबत मी रीतसर करमाळा पोलीस स्टेशन येथे एफ आय आर नंबर 0785/2023 ने दिनांक 5 ऑक्टोंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली आहे परंतु तक्रार दाखल केल्यापासून सदर प्रकरणातील आरोपीवर तब्बल दोन महिने झाले तरीही अद्याप पर्यंत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही उलट सदर आरोपी राजरोसपणे करमाळा येथे फिरत आहेत यावरून हे स्पष्ट दिसून येत आहे की पोलीस आणि संबंधित आरोपी मध्ये आर्थिक संगणमत झाल्याचे दिसून येत आहे असे निवेदनात म्हटले आहेसदर आरोपीवर कारवाई करणे बाबत मी पोलीस स्टेशनला विचारण केली असता पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी उलट मलाच म्हणतात की तू आम्हाला सांगू नको काय करायचे ते अन्यथा तुझ्यावरच 498 चा खोटा गुन्हा दाखल करून अटक करू असे सांगून मला हाकलून दिले जात आहे मी सध्या भयभीत वातावरणात जीवन जगत आहे त्यामुळे मला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी सदर वरील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा मी सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणास बसणार असल्याचे श्री भोसले यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे निवेदनाच्या प्रती अधिक माहितीस्तव मा.मुख्यमंत्री मुंबई, गृहमंत्री मुंबई, मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करमाळा, तसेच पोलीस निरीक्षक करमाळा आदिना पाठवले आहे