अ.सलाम दलाल मृत्यु प्रकरणी नामदार अनिल पाटील साहेब यांना निवेदन… जुबेरभाई बागवान
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सोलापुरातील मंगळवार बाजार येथे राहणाऱ्या सलाम दलाल या 35 वर्षीय तरुणाचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता,परवा सोलापुरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता यामुळे कुंभार वेस (मंगळवार बाजार) परिसरातला नाला ओवर फ्लो झाला होता.अशात अ सलाम दलाल घरी निघालेला असताना गाडी घसरून तो नाल्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता…
अ. सलाम दलाल यांचे वडील देखील 26-11 च्या हल्ल्यातील जखमी पैकी होते, परंतु त्यांचा हि कोरोनामध्ये मृत्यू झाल्याने आणि आता घरातील करता पुरुष असलेला अ सलाम याचा देखील दुर्दैवी अंत झाल्याने परिवारातील सदस्या समोर मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.
अ सलाम दलाल यांना तीन अपत्य असून ते तिन्ही अपत्य अजुन बाल्य अवस्थेत असल्याने त्यांचे भवितव्य अंधारात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे दोन दिवसीय वैचारीक मंथन शिबिर सुरु आहे,या शिबिरात महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मा ना अनिल पाटील साहेब यांची भेट युवा नेते जुबेर भाई बागवान यांनी घेतली आणि अ सलाम दलाल यांच्या मृत्यु ची सर्व हकीकत सांगत दलाल परिवाराला मदत करण्याचे आवाहन करुन रितसर निवेदन हि दिले,या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चे संतोष पवार आणि उमेश पाटील हे देखील हजर होते…