माळीनगर फेस्टिवलची तयारी पूर्ण२ ते ५ डिसेंबर भरणार फेस्टिव्हल : राजेंद्र गिरमे यांची माहिती
प्रतिनिधी – रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क 9921500780
माळीनगर मधील विविध संस्थांच्या वतीने आयोजित माळीनगर फेस्टिव्हल व विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे दि.२ ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजन केले असल्याची माहिती दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन व फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक राजेंद्र गोपाळराव गिरमे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, शुगरकेन वि.का.स सोसायटी,महात्मा फुले पतसंस्था,माळीनगर मल्टिस्टेट व माळीनगर विकास मंडळ यांच्या सहकार्याने मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर ‘माळीनगर फेस्टिव्हल’ व विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
माळीनगर फेस्टिव्हलचे हे १८ वे वर्ष असून या फेस्टिव्हलचे उद्घाटन माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे हस्ते २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी,विविध संस्थांचे पदाधिकारी व संचालक उपस्थित राहणार आहेत.
माळीनगर फेस्टिव्हलची उत्कंठा माळशिरस तालुक्यातील मुले-मुली, महिला,नागरीक,शेतकरीवर्ग,रसिक प्रेक्षक व ग्रामस्थांना लागली आहे.या फेस्टिव्हलला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास एक लाख रसिक प्रेक्षक भेट देवून आनंद घेतील.या फेस्टिव्हल करिता प्रशालेच्या मैदानावर जवळपास ११० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.
तसेच फेस्टिव्हलच्या निमित्ताने सासवड माळी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा,दि मॉडेल विविधांगी प्रशाला व गुलमोहर इंग्लिश स्कूल यांचे १०५ भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सायं.६ ते १० वाजेपर्यंत होणार असून यामध्ये प्राथमिक ते इ.९ वी पर्यंतच्या जवळपास १७०० विद्यार्थ्यांना स्टेज डेअरिंग होणे,सादरीकरण होणे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने हे फेस्टिव्हल व स्नेहसंमेलन भरविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा नृत्यांचा सराव देखील पूर्ण झालेला आहे.या फेस्टिव्हलने अल्पावधीतच नावलौकिक मिळवून दिलेला आहे.
बाळ -गोपाळांसाठी मनोरंजन पार्कमध्ये लहान मोठे पाळणे (जॉईंट व्हील), कोलंबस, ब्रेकडान्स, सेलंबो, क्रॉसव्हील,रेंजर,ड्रॅगन ट्रेन, बॉन्सिंग, जहाज, जंम्पिंग, लहानमुलांची विविध खेळणी आदि प्रकार उभारले आहेत. याशिवाय स्टॉलमध्ये महिलांसाठी ज्वेलरी, खवय्यांसाठी परिसरातील व्हेज व नॉनव्हेज यातील नाश्ता ते भोजनापर्यंत वेगवेगळ्या इंडियन व चायनीज डिशेस चे मेनू असलेले स्टॉल्स सुद्धा असणार आहेत.
याकाळात फूड टेस्टिंग,फूड लायसन्स ची तपासणीसाठी केली जाणार असून सर्वत्र स्वछता ठेवली जाणार आहे.रसिक प्रेक्षकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे.फेस्टिव्हल यशस्वी होण्यासाठी विविध समित्यांच्या बैठका होत असून संस्थेचे सर्व विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या फेस्टिवलचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. राजेंद्र गिरमे यांनी यावेळी केले आहे.