सलाम दलाल मृत्यु प्रकरणी जिल्हाधीकारी यांना निवेदन…
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
सोलापुरातील मंगळवार बाजार येथे राहणाऱ्या सलाम दलाल या 35 वर्षीय तरुणाचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. सोलापुरात काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे कुंभार वेस परिसरातला नाला ओवर फ्लो झाला होता. अशात सलाम दलाल घरी निघालेला असताना गाडी घसरून नाल्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
सलाम दलाल यांच्या वडिलांना 26-11 च्या हल्ल्यात गोळी लागल्याने जखमी झाले होते. कोरोनामध्ये त्यांचा देखील मृत्यू झाला. तर आता करता पुरुष असलेला सलाम याचा देखील दुर्दैवी अंत झाला आहे.
सलाम याला अवघ्या तीन महिन्याचे,तीन वर्षाचे आणि पाच वर्षाचे एकूण तीन मुले असून या तीनही मुलांचा भवितव्यात अंधारात आहे.
तरी आज सलाम दलाल याच्या घरातील कुंठुबियांन न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाअधिकारी यांना निवेदन देऊन सांगण्यात आले की लवकरात लवकर CMO ऑफीस येथे अहवाल सादर करुण पिढीत कुंठुबास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निधीतून सदर कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या साठी निवेदन देण्यात आले
सदर चे निवेदन देते वेळी सोलापूर शहर बागवान जमात सिटी ट्रस्ट चे खजिनदार इम्तियाज दलाल,युवा समाजसेवक मोहसीन मैंदर्गीकर यांच्या सह दलाल परिवारातील सदस्य आणि बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते…