हडपसर पोलीस ठाणे तपास पथकाकडून घरफोडीचे ४ गुन्हे उघड – मौजमजेकरिता घरफोडी करणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात
प्रतिनिधी.. रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १८१५/२०२३ भा.दं. वि. कलम ३८० मधिल फिर्यादी यांचे लोहीया गार्डन, मगरपट्टा चौक, हडपसर पुणे या ठिकाणी असलेल्या स्टोअर रुम व ऑफीस रुमच्या मध्ये ठेवलेले लॅपटॉप व पॉलीकॅब कंपनीच्या वायरचे बंडल चोरी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अविनाश शिंदे पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, भगवान हंबर्डे असे दाखल गुन्ह्यासंदर्भाने माहीती घेत असताना प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपींचे वर्णनाबाबत माहीती मिळाली. तपासा दरम्यान पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, भगवान हंबर्डे यांना मिळालेल्या बातमीचे आधारे ३ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा तसेच हडपसर पोलीस ठाणे हद्दीत वेळोवेळी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहीती दिली. सदरचे गुन्हे हे त्यांनी मौजमजेकरीता पैशांची आवश्यकता असल्याने केले असल्याचे सांगीतले.
उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे.आरोपींकडून दाखल गुन्ह्यातील चोरीस गलेला लॅपटॉप व पॉलीकॅब वायर, दुचाकी व इतर साहीत्य असा वा किं.रू १,८२,०००/- चा हस्तगत करण्यात आल्या आहे. सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा साो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे साो, पोनि. (गुन्हे), श्री. संदीप शिवले साो, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्ड, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.