पोलीस मित्र परिवार समन्वय महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे नाशिक येथील 2000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थे तर्फे शैक्षणिक उपक्रम राबवून गरजु मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हा उपक्रम संस्थेचे विद्यमान नासिक शहर कैलास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात आला . आता पर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये 2000 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक12 जुलै 2023 रोजी पोलीस मित्र परिवार समनव्य समिती महाराष्ट्र राज्य व ज्ञान अमृत आदिवासी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न एड्यूकेशन सोसायटी बालवाडी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जुने सिडको येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी राहुल जोरे ( महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्ष ),योगेश पाटील ( नासिक जिल्हा सचिव ), सौ. पुजा परदेशी ( नासिक जिल्हा महिला अध्यक्ष), कैलास सूर्यवंशी ( नासिक शहर अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष ज्ञान अमृत आदिवासी बहुउद्देशीय संस्था) तसेच शाळेचे मुख्याध्यापक तिवारी सर व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.



