महाराष्ट्र

तुळजापूर चे आमदार राणा जगजीत सिंह पाटील त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुस्लिम समाजासाठी 15 लाख रुपयांचे सभा मंडपाच्या भूमी पुजनाचे उद्घाटन संपन्न

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2022 23 या योजनेअंतर्गत काटगाव येथील मुस्लिम समाजासाठी 15 लाख रुपयांचे सामाजिक सभा मंडप मंजूर करण्यात आलेले असुन सदर कामाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कामाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते व विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन तोफिक तालिकोटे व युसुफ मुलाणी( टेलर). शिव अल्पसंख्यांक सेनेचे वरिष्ठ नेते सैपन शेख. अब्दुल खताल सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात सामाजिक विकास कामासाठी आणखीन निधी आणण्याचा दृढ निश्चय केला तसेच समाजाची अविरत सेवा करण्याच्या संकल्प केला.

या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थ व मुस्लिम समाज उपस्थित होता . या कार्यक्रमासाठी अब्दुल मुजावर. अफसर शेख. अल्लाउद्दीन मणियार. रफिक हिपळे. वकील पठाण. पैगंबर खताल. हाफिज खताल. अखिल पठाण. शब्बीर मुर्शिद. अल्ताफ खताल. कुर्बान गवंडी. मुन्ना शेख. व फत्तु जनोदी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले अफसर शेख यांनी केले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button