महाराष्ट्र

म्हसरुळ नाशिक येथे स्नेहालय फाऊंडेशन नामफलक उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

टाईम्स नाईन न्यूज मराठी नेटवर्क प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.

स्नेहालय फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले वृक्षारोपण ही काळाची गरज असून वृक्षतोड थांबली तरच पर्यावरण संतुलित राहील वृक्षारोपण कार्यक्रम घेवुन नैसर्गिक हिताचे कार्य अध्यक्षा सौ. स्नेहल अनिल ठाकरे व पदाधिकाऱ्यांनी केले असे मत अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव यांनी स्नेहालय फाऊंडेशन नामफलक उद्घाटन समारंभ व वृक्षारोपण प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकच्या मा. महापौर रंजनाताई भानसी ह्या होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन व अभिवादन करण्यात आले. तर स्नेहालय फाऊंडेशन च्या नामफलकाचे उद्घाटन व व्दिपप्रज्वलन रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून अ.आ.नि.स.चे प्रदेश कार्याध्यक्ष मा.वसंतराव वाघ मामा, नगरसेवक अरुणभाऊ पवार, अआनिस जिल्हाध्यक्षा मनिषा म्हसदे, शहराध्यक्ष सचिन बागुल, महीला शहराध्यक्षा राधा क्षिरसागर, सल्लागार मनिषा पाटील, जिल्हा उपाध्यक्षा यमुनाताई लिंगायत, सुनिलभाऊ परदेशी, शहर कार्याध्यक्ष योगेश साळी, सुनिता गांगुर्डे, संगिता पवार, ऊज्वला गांगुर्डे, निर्मला गायकवाड, ओझर शहराध्यक्ष वर्षा बोरसे, तृतीयपंथी गुरु राखीताई मोरे, कवयित्री व उपशिक्षीका सिमा बागुल, आदीं उपस्थित उपस्थित होते.

त्यांचा सत्कार गुलाबपुष्प देवुन उपाध्यक्ष अनिल ठाकरे सर यांनी केला. प्रथम प्रास्ताविक स्नेहालय फाऊंडेशन च्या अध्यक्षा व अ.आ.नि.स.च्या शहर सरचिटणीस सौ.स्नेहल अनिल ठाकरे यांनी केले. तर प्रास्ताविक मनिषा म्हसदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल ठाकरे, मनिषा पाटील, कल्पना खैरनार,सरीता निंबाळकर, रोहिणी कुमावत, स्मिता काळूसे, सुजाता जाधव, आकांक्षा खांदवे, राजश्री मोरे, वर्षा साळवे, सोनवणे ताई, सचिन शिराळ,सागर पाटील, कु.वैष्णवी अनिल ठाकरे, आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button