संपादकीय

रामकृष्ण माने यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा (प्रतिनिधी)

येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे संस्थापक-अध्यक्ष रामकृष्ण माने यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. असे मत करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.माने यांना सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य परिषद सोलापूरच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महात्मा फुले राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले आहे. त्या पार्श्वभुमीवर आमदार संजयमामा शिंदे यांनी माने यांचा सन्मान केला. त्यावेळी आ. शिंदे हे बोलत होते.याप्रसंगी आमदार संजयमामा शिंदे यांनी माने यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मकाईचे माजी संचालक विवेक येवले, देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button