पायल गांधी यांची डिजिटल मीडिया संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

करमाळा प्रतिनिधी
डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पायल गांधी यांची आज निवड करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, सतीश सावंत जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले.
आज पंढरपूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशी कुमार शिंदे यांचा वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमादरम्यान महिला पत्रकार म्हणून पायल गांधी यांचा सत्कार देखील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला..

यावेळी बोलताना सौ. पायल गांधी. म्हणाल्या की, डिजिटल मीडिया संघटनेने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी यशस्वीरित्या मी पार पाडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करेन. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेला मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे आश्वासन देखील यावेळी महिला पत्रकार सौ. पायल गांधी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

डिजिटल मीडिया संपादक संघटना ही राज्यातील सर्वात मोठी पत्रकार संघटना आहे. डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी ही संघटना आहे आज या संघटनेसोबत काम करताना मला आनंद होत आहे.डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर यांनी माझ्यावर महिला जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. जिल्ह्यामध्ये संघटनेचा विस्तार करणे आणि महिला पत्रकारांची मोट बांधणी करणे,डिजिटल मीडियाचे संघटन वाढवणे हे माझ्या पुढचे प्रामुख्याने उद्दिष्ट असणार आहे त्याचबरोबर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्वच महिला पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी पायल गांधी यांनी व्यक्त केले आहे..
पायल गांधी या सोलापूर जिल्ह्यातील एक नावाजलेल्या निवेदिका अँकर आहेत. त्याचबरोबर पत्रकारिता देखील त्या करतात जिल्ह्यातील अनेक लोकप्रिय चॅनलच्या व्हॉइस रेकॉर्डर तसेच अँकर म्हणूनही त्या काम करतात . जिल्ह्यातील अनेक युट्युब चॅनेलला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात पायल गांधी यांचा मोलाचा वाटा आहे त्यांची धारदार लेखणी आणि सुंदर आणि मधुर अशा आवाजामुळे दर्शक आणि वाचक हे मंत्रमुग्ध होऊन अनेक बातम्या पाहत असतात. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली आहे तसेच निडर पत्रकारिता करत राज्यामध्ये त्यांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

पायल गांधी यांचे कौशल्य आणि निर्भीड पत्रकारितेचे कौतुक करावे तितके कमीच आहे म्हणूनच त्यांची निवड डिजिटल मीडियाच्या सोलापूर महिला जिल्हाअध्यक्षपदी करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जाते



