शहर

अकलूज नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी सौ. राणीताई खंडागळे यांच्या नावाची जोरदार चर्चा,निष्ठावंतांना संधी मिळणार?

🎯​माळशिरस तालुक्याचे नंदनवन मोहिते-पाटील परिवाराच्या अथक प्रयत्नांमुळेच

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​अकलूज: एकेकाळी उजाड माळरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्याला नंदनवन बनवण्यामध्ये मोहिते-पाटील परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासोबतच, हा परिवार नेहमीच गरीब, तळगाळातील बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजकीय, धार्मिक, सामाजिक, तसेच रोजगार व व्यवसायाच्या माध्यमातून संधी देऊन अग्रक्रमाने प्रयत्नशील राहिला आहे.

​नगराध्यक्ष पद अनुसूचीत महिलांसाठी राखीव; निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी

​सध्या अकलूज नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसूचीत महिलांसाठी राखीव झाले आहे. मोहिते-पाटील परिवाराचा पूर्वापार इतिहास पाहता, त्यांनी नेहमीच गरीब व निष्ठावंत बहुजन समाजाला योग्य संधी दिलेली आहे. यामुळे, आगामी निवडणुकीत नगराध्यक्षा पदाची उमेदवारी देताना, मोहिते-पाटील परिवारासोबत तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ असलेल्या सौ. राणीताई संदिप खंडागळे यांना संधी मिळावी, अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

​खंडागळे परिवाराची तीन पिढ्यांची निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी ​सौ. राणीताई संदिप खंडागळे यांच्या परिवाराचे मोहिते-पाटील कुटुंबाशी जुने ऋणानुबंध आहेत. त्यांचे सासरे कै. शंकर खंडागळे आणि त्यांचे पती श्री. संदिप खंडागळे यांचे कुटुंब मोहिते-पाटील परिवाराचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते.सौ. राणीताई आणि त्यांचे पती संदिप खंडागळे हे अकलूज शहरात मोहिते-पाटील परिवारासमवेत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, महात्मा फुले, सावित्रामाई फुले, महंमद पैंगबर, राजमाता अहिल्यादेवी अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गरीब महिलांना साडी वाटप, रक्तदान शिबीर, वाचनालयास पुस्तके दान, जिलेबी खाऊ वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, तसेच कोरोना काळात मास्क व सॅनिटायझर वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, संविधान दिन, मुकनायक परिसंवाद, दलित पँथर सन्मान यांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

​याशिवाय जय मल्हार गणेशोत्सव मंडळ, राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील नवरात्र मंडळ, संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांच्या माध्यमातून गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, तुकाराम महाराज बीज निमित्त अभंग गाथा पठन सप्ताह, आषाढी वारी दिंडी, तसेच शिखर शिंगणापूर कावड यात्रा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांमधून खंडागळे परिवार अकलूजच्या नागरिकांबरोबर सदैव सामाजिक बांधिलकी जपत आलेला आहे.

​राजकीय क्षेत्रातील सक्रियता
​विविध सामाजिक कार्यक्रमांमुळे संदिप खंडागळे यांचा अकलूज शहरात मोठा संपर्क आहे. त्या मागील २० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत मोहिते-पाटील परिवारासोबत होम टू होम प्रचारामध्ये अग्रेसर असतात आणि कुठलीही निवडणूक असो पूर्णवेळ बुथवर उपस्थित असतात.

​जनतेतून मागणी: गरीब कुटुंबातील, तरुण चेहऱ्याला संधी मिळणार?
​अकलूज शहराच्या विकासासाठी, मोहिते-पाटील परिवाराकडून नगराध्यक्षा पदाकरिता निवडणूक लढविण्याची संधी गरीब कुटुंबातून उदयास आलेल्या आणि तरुण चेहरा असलेल्या सौ. राणीताई संदिप खंडागळे यांना मिळावी, अशी मागणी सर्व समाज आणि जनतेतून होत आहे. खंडागळे परिवाराची निष्ठा आणि त्यांची सामाजिक कार्यामध्ये असलेली सक्रियता पाहता, त्यांना ही संधी मिळणारच अशी अकलूज शहरात जोरदार चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button