महाराष्ट्र

पुन्हा मतदार नोंदणीची संधीनोंदणी करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो.9921500780

भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024दिनांक आवर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी ,पडताना, योग्य प्रकार फोटो, तसेच मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रामाणिकरण करण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत या काळात शनिवार ,रविवार, दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तरी १८ वर्षे पूर्ण झालेला व त्यावरील सर्व नागरिकांनी www.voters.ecl.gov.in व voter helpline App (VHA) च्या माध्यमाने नोंदणी करावी.


मतदार यादी मध्ये आपले नाव आहे की कसे हे शोधण्यासाठी www.electorasearch.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार अधिकारी ,तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहा.मतदार नोंदणी अधिकारी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) किंवा दूरदरी क्रमांक 1950 यावरती संपर्क साधावा. आपली नावे, फोटो, पत्ता, व इतर बाबी मतदार यादी मध्ये तपासून घ्यावीत ज्यांची दुरुस्ती असेल त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी व नागरिकांची नावे मतदार यादी मध्ये नाहीत अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन, BLO, व मतदान नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत असे आव्हान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button