महाराष्ट्र

लग्नातील वायफट खर्चाला फाटा देत गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सात हजाराची रक्कम गावकऱ्यांना सुपूर्द, पिंपरी बुद्रुक येथील बाळासाहेब घाडगे कुटूंबियांचा समाजाला नवा आदर्श

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

पिंपरी बुद्रुक येथील बाळासाहेब घाडगे कुटूंबियाने समाजाला लग्नातून एक नवीन आदर्श घालून दिला आहे. लग्नातील वायफट खर्चाला फाटा देत गावातील मंदिरात गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सौ. रजनी व बापुसाहेब मोरे महाराज यांच्या हस्ते सात हजाराची रक्कम सरपंच सौ ज्योती व श्रीकांत बोडके यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली.

पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) येथील बाळासाहेब जगन्नाथ घाडगे यांची कन्या पुजा व शहाजी बोडके यांचे चिरंजीव भुषण यांचा विवाह हिंदू रितीरिवाजाप्रमाणे नरसिंहपूर येथील ए-वन मंगल कार्यालयात नुकताच संपन्न झाला.

पिंपरी बुद्रुक येथीलच दोन्ही कुटुंबे असल्याने हळदीच्या दिवशी परंपरेप्रमाणे डिजे, डाॅल्बी, लेझीम, हलगी व फटाके लावून काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीला वधू पक्षाने फाटा दिला. साध्या पध्दतीने गावातील देवांचे दर्शन घेऊन नंतर हळदी समारंभ करण्यात आला.

मिरवणुकीसाठीच्या पैशाची झालेली बचतीचा योग्य विनियोग करण्याचे ठरवण्यात आले. त्यामध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज सौ. रजनी व बापूसाहेब मोरे देहूकर महाराज यांच्या हस्ते सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके, सोसायटीचे अध्यक्ष अशोक बोडके, आनंदकाका दाते, पोलीस पाटील वर्धमान बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, निलेश बोडके, भानुदास पाटील आदि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button