रोटरी क्लब अकलूजचे वतीने माळीनगर येथे चिंच,जांभुळ ,बदाम ,आवळा इत्यादि रोपांचे वाटप

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
रोटरी क्लब अकलूज यांचे वतीने कृषी दिनाचे निमित्ताने शुगर केन विविध कार्यकारी सोसायटी माळीनगर या सोसायटीच्या शेतकरी सभासदांना रोपे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.रोटरी क्लबच्या वतीने चिंच,जांभूळ,बदाम,आवळा यासारखी १०० रोपे शेतकऱ्यांना दिली. यावेळी शुगरकेन सोसायटीचे वतीने रोटरीचे नूतन अध्यक्ष रो.ओजेस दोभाडा व नूतन सेक्रेटरी रो.कल्पेश पांढरे यांचा सत्कार करण्यात आला

रोटरी क्लब शुगर घेऊन सोसायटी मिळून पुढील काळात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचे यावेळी ठरले.रो.कल्पेश पांढरे यांनी रोटरी क्लबच्या कार्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा. चेअरमन कपिल भोंगळे,संचालक कुणाल इनामके,जयवंत चौरे, सुरेश राऊत,मनीष रासकर, नामदेव अभंग,विद्या गिरमे,अलका बोरावके,रोटरीचे अध्यक्ष ओजस दोभाडा,सेक्रेटरी कल्पेश पांढरे,नवनाथ नागणे,केतन बोरावके, जयदीप बोरावके,पृथ्वीराज भोंगळे,महादेव मगर,अजित वीर यांच्यासह सभासद राजीव नवले,हेमंत रासकर, विलास इनामके,निलेश बोरावके,विराज गिरमे,रोहित गिरमे,विनोद पांढरे,दीपक गिरमे,दीपक गायकवाड, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गिरमे यांनी केले.
त्याचप्रमाणे रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.डॉक्टर्स डेनिमित्त डॉ. संतोष दोशी,डॉ.निनाद पडे, डॉ.अभिजीत गांधी,डॉ. बाहुबली दोशी,डॉ.अमोल फडे,डॉ.श्रीकांत देवडीकर,डॉ.संकेत जोशी, डॉ अभिजीत मगर यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच सीए डेनिमित्त अकलूजचे सीए सुशील गांधी,सीए नितीन कुदळे, सीए विक्रांत माने-देशमुख,सीए अजित वीर यांचे सोबत चार्टर्ड अकाउंट असोसिएशनच्या सर्व सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन रोटरी क्लब अकलूज यांचे वतीने सत्कार करण्यात आला.



