मंगरूळ ता. तुळजापूर येथील हजरत गैबी पीर (र.अ) यांचा गुरुवार दि. 6 जुलै 2023 रोजी उरूसाचे ( याञा) आयोजन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
मंगरूळ ता.तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील हिंदू मुस्लिमांचे ऐक्याचे प्रतीक असलेले आणि सर्वांचे श्रध्दा स्थान असलेले ग्रामदैवत हजरत गैबी पीर ( र.अ) यांचा उरुस( यात्रा) सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी संपन्न होत असून

दिनांक 5 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता संदलचा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच हजरत गैबीपीर यांच्या दर्शनास येणाऱ्या सर्व समाजातील भाविकांसाठी सालाबाद प्रमाणे महाप्रसादाचे ( खीर) आयोजन केले असून

यामध्ये समस्त मंगरूळ ग्रामस्थ आणि मुलाणी परिवारांच्या सहकार्याने हा कार्यक्रम साजरा केला जातो तरी मंगरूळ आणि परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी या महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मुलाणी परिवार -मंगरूळ, यांच्यावतीने करण्यात आले आहे.



