शहर

प्रेम संबंधास बापाचा विरोध-सांगली जिल्ह्यात बापानेच केला स्वतःच्या मुलीचा खून

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

प्रेमप्रकरणास चिडून वडिलांनी स्वयंपाक घरातल्या चाकूने मुलीचा खून केल्याची घटना मंगरूळ (ता.खानापूर) येथे घडली आहे. श्रेया संतोष जाधव असे दुर्दैवी मुलीचे नाव असून तिची बहिण किरण जाधव हिने विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

यावरून वडिल संतोष जगन्नाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रेया जाधव हिचे तिच्या नात्यातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र वडिलांचा त्याला विरोध होता. त्यावरून वडिलांनी श्रेयाचे कॉलेजला जाणेही बंद केले होते. काल शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास श्रेया आणि वडील संतोष हे दोघे स्वयंपाक घरात याबाबत चर्चा करत होते. यावेळी श्रेया कॉलेज ला जाण्याचा हट्ट करीत होती. मात्र वडिलांनी तिला संबंधीत मुलाशी न भेटण्याची अट घातली होती. यावेळी आई आणि वडिलांनी तिला वय पूर्ण होईपर्यंत थांब मग लग्न करूया, असे सांगितले. मात्र श्रेया काहीही ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हती. यावरून वाद झाल्यानंतर वडिल संतोष त्यांनी रागाच्या भरात समोर असणारा भाजी चिरण्याचा चाकू घेऊन श्रेयावर हल्ला केला. यामध्ये श्रेया ही गंभीर जखमी झाली होती. तिला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र यात तीचे निधन झाले. दरम्यान या प्रकरणी मृत श्रेयाचे वडील संतोष जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button