शिवसेनेच्या वाघ नखा नंतर आता राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे फरार -इक्बाल मुल्ला (पत्रकार) सांगली

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी ‘ यांनी राष्ट्रवादीच्या “70 हजार कोटी ” रुपयांच्या भ्रष्टाचार बद्दल सांगून 2 दिवस होत नाहीत तोपर्यंत आज राष्ट्रवादी मध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात “भूकंप ” झाला .
“ईडी “च्या चौकशी मुळे राष्ट्रवादी आणि अनेक आमदार अस्वस्थ होते .त्यामुळे निदान “आगामी निवडणुकांपर्यंत” शिंदे – फडणवीस सरकारमध्ये “सामील” व्हा असा सल्ला काकांनी दिला असावा असे वाटते . कारण शरद पवारांचे निकटवर्तीय -खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल , छगन भुजबळ , आणि खासदार सुनील तटकरे हे देखील नव्या सरकारमध्ये “डेरेदाखल” झाले आहेत. आणि कित्येकांना मंत्रिपद- देखील मिळाले आहे .

अजित पवारांना “प्रदेशाध्यक्ष” हवे होते .जे “जयंत पाटील ” हे समर्थपणे सांभाळत आहेत . त्याबरोबरच राष्ट्रवादी मध्ये “सुप्रियाताई सुळे” यांचे महत्व “अधोररखित ” झाल्यानंतरच ,राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा त्यांनी निश्चय केला असावा .
राष्ट्रवादी मध्ये काकांचा शब्द अंतिम असतो परंतु आज “पुतण्याने” संपूर्ण बाजी एका क्षणात पलटवली आहे .आणि अर्धी राष्ट्रवादी “फोडली” आहे .
शिवसेनेच्या वाघ नखानंतर आता .. राष्ट्रवादी च्या घड्याळाचे काटे “फरार” झाल्याचे स्पष्ट होत आहे . भविष्यात “महाआघाडी “उध्वस्त” होईल अशी शक्यता नाकारता येत नाही . पडद्यामागील या खेळीचे “गेमचेंजर”हे देवेंद्र फडणवीस “ठरले आहेत. त्यांच्याच “रणनीती” नुसार नुसार एकनाथ शिंदे फुटले ..आणि आज अजित पवारांना देखील त्यांनी आपल्या “गळास” लावले .
ज्यापद्धतीने -महाआघाडी- च्या स्थापनेपूर्वी -अजित पवार पहाटे शपथविधी घडवून अवघ्या 72 तासात सरकार उलथवले ..तसाच काहीसा प्रकार सध्या होत आहे असे दिसते. सत्य काय आहे ,हे लवकरच समजेल अशी आशा आहे .पाच बोटे जरी वेगवेगळी असली तरी चमचमीत तुपाचे पदार्थ खाण्यासाठी ते एकत्रच होतात .असाच प्रकार महाराष्ट्रात घडतो आहे. कारण -सत्ता- प्रत्येकाला हवी आहे .भविष्यात अजित पवार हे निश्चितपणे “मुख्यमंत्री ” असते ,परंतु त्यांना बहुदा चौकशीचा “ससेमिरा” नकोसा असावा .असो ,
ज्या एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शिवसेना फोडली ,आता त्याच अजित पवार यांच्याबरोबर त्यांना “संसार” करावा लागणार आहे .शिवसेना फुटली ..आता राष्ट्रवादी ही फुटली ..आता भविष्यात “भाजपचे “काम सोपे होईल ..कारण राजकारणात त्यांना काँग्रेस -शिवसेना आणि छोट्या पक्षाशिवाय कोणी प्रमुख “विरोधकच” शिल्लक असणार नाही .
इकबाल मुल्ला ( पत्रकार)
संपादक – सांगली वेध ,
संपादक -वेध मीडिया न्यूज सांगली .
*मोबाईल -8983587160



