30 लाख रुपयांची लाच स्वीकारणारे नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे व वकील शैलेश सभद्रा.. अँटी करप्शन ब्युरो नाशिक पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क.प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये कायदेशीर रित्या विजय प्राप्त करून संचालक पदावर निवड झालेल्या संचालकाच्या निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावर सुनावणी देऊन ती सुनावणी तक्रारदार म्हणजे विजयी संचालकाच्या बाजूने लावून देण्यासाठी विजयी संचालकाकडे 30 लाख रुपयांच्या लाचेची मागणी आणि स्वीकार करणारे नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे व वकील शैलेश सभद्रा या दोघांना अँटी करप्शन ब्युरो नाशिक पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री 8.30 वाजता रंगेहात अटक करून या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नाशिक जिल्ह्यात नुकताच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये नाशिक येथील (40) वर्षीय पुरुष तक्रारदार कायदेशीर रित्या निवडून आल्यावर त्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी निवड झाली आहे. त्यांची या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावर त्यांच्या बाजूने निर्णय लावून देण्यासाठी नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे वय वर्ष (57) राहणार नाशिक व वकील शैलेश सुमातीलाल सभद्रा वय वर्ष (32) राहणार नाशिक या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे 30 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी या दोघांची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो नाशिक कार्यालयात केली होती.
या तक्रारीची या कार्यालयामार्फत पडताळणी झाल्यानंतर श्रीमती शर्मिष्ठा धारणे – वालावलकर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नाशिक परिक्षेत्र व श्री.नारायण न्याहाळदे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नाशिक परिक्षेत्र तसेच पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो नाशिक पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव मुरकुटे, पोलीस नाईक मनोज पाटील, पोलीस नाईक अजय गरुड या पथकाने सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी रात्री 8:30 वाजता (40) वर्षीय तक्रारदार संचालक यांच्याकडून 30 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना पंचासमक्ष त्यांच्या नाशिक येथील राहत्या घरी रंगेहात अटक करून त्यांचा साथीदार वकील शैलेश सभद्रा याला देखील पोलिसांनी अटक करून या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.



