करमाळा तालुक्यातील आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गा येथे मोहरम सन उत्साहमय व शांततेच्या वातावरणात संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
करमाळा तालुक्यातील वली चांद पाशा दर्गा मध्ये प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोहरम सन उत्साहमय व शांततेच्या वातावरणात पार पडला असल्याची माहिती दर्गाहाचे खादिम सेवेकरी गुलामनवी कादरी व इरफान कादरी यांनी दिली

मोहरम सना निमित्त आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गा येथून हजरत इमाम हसन व हुसेन तसेच मौलाअली यांच्या पंजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सदरची मिरवणूक वली बाबा दर्गा येथून निघून त्याचा शेवट आवाटी गावातील हजरत आबिद अली शहा कादरी यांच्या दर्गा मध्ये झाला यावेळी फातीहाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात होती
मोहरम सन पाहण्यासाठी आवाटी येथील दर्गा मध्ये करमाळा तालुक्यातील याशिवाय मुंबई, पुणे, सोलापूर गुलबर्गा हैदराबाद बिदर मिरज सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर बीड अहिल्यानगर धाराशिव आदी भागातील भक्तगण मोठे संख्येने उपस्थित होते उपस्थित आलेल्या भक्तगणांना गोड शरबत वाटप करण्यात आले
एकंदर पाहता आवटी येथील वली चांद पाशा दर्गा मते मोहरमचा सण शांततेच्या वातावरणात पार पडला
सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आवाटी येथील ग्रामस्थ तसेच वली चांद पाशा दर्गा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले



