कै.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचाच विचार डोळ्यांसमोर ठेवून मुलींच्या शिक्षणासाठी मोफत बस प्रवास पास उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध – प्रमोद शिंदे आगार प्रमुख

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी
शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला ,यशवंतनगर येथे कै. रत्नप्रभादेवी मोहिते -पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण व वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला.
प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान निकाल व सर्व देणगीदारांविषयी असणाऱ्या कृतज्ञ भावना प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडल्या.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमोद शिंदे आगारप्रमुख अकलूज आगार पथक व प्रशाला समिती सभापती जेष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे यांच्या शुभहस्ते रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने संपन्न झाला.

प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी आर्यन अविनाश मगर,श्रावणी सतीश इंगळे, सुमित गोरख बंडगर व त्याचप्रमाणे सर्व विशेष गुणवत्ता धारक विद्यार्थी व सर्व देणगीदार यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
भूमिका कारमकर व श्रावणी मोहिते यांनी आपल्या भाषणातून रत्नप्रभादेवी मोहिते -पाटील यांच्या जीवन चरित्रावर शब्द पुष्पांजली वाहिली. प्रशालेतील सहशिक्षिका प्रभावती लंगोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नावाप्रमाणेच रत्नांची खाण असणाऱ्या रत्नप्रभादेवी मोहिते -पाटील यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील यांना सामाजिक, राजकीय कौटुंबिक क्षेत्रात मोलाची साथ दिली.
प्रमुख अतिथी प्रमोद शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की,मुली शाळेच्या लांबच्या अंतरामुळे शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहू नये म्हणून मुलींना मोफत बस प्रवास पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमास अकलूज आगार पथकाचे विजय लंगोटे ,उदय दुपडे ,विजय रणदिवे ,प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी ,अनिल जाधव, नितीन इंगवले देशमुख, नवनाथ पांढरे, मुख्याध्यापिका सविता गायकवाड, उप मुख्याध्यापक भारत चंदनकर ,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे व बहुसंख्य पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना रणनवरे यांनी केले तर आभार संतोष मगर यांनी मानले.



