आरोग्य

अकलूज च्या उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गोर गरीब रुग्णांच्या खिशावर डल्ला…

🎯 अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

अकलूज येथील उप जिल्हा रुग्णालया साठी “विकासरत्न” विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेळोवेळी लक्ष घालून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मशिनरी आणल्याने याचा फायदा रूग्णांना झाल्याने गेल्या काही वर्षात अकलूज येथील उप जिल्हा रुग्णालयाने अक्षरशः कात टाकलेली आपण सर्वांनी पाहिले परंतु तिथे ड्यूटी वर असणाऱ्या काहीनी उप जिल्हा रुग्णालयाची पार वाट लावून टाकल्याचे सध्या तरी दिसून येत आहे…

माळशिरस तालुक्या सह अकलूज परिसरातील गोर गरीब महिला प्रसूती साठी अकलूज च्या उप जिल्हा रुग्णालयात येऊन ऍडमिट होण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्या प्रयत्नांना उप जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ मोनिका मिसाळ ह्या स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्याच यजमानांचे मेडी स्कॅन डायग्नोस्टिक सेंटर असणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरचीच 9 व्या महिन्याची सोनोग्राफी करण्यास चिट्टी देतात आणि त्या चिट्टी वर 500/600 दर आकारले जावे असा उल्लेख करतात,मुळात 9 व्या महिन्यात गरोदर स्त्रियांना सोनोग्राफी करणे या साठी सरकारी नियमा नुसार तीन डायग्नोस्टिक सेंटरला परवानगी दिली असता या मध्ये डॉ टेके डायग्नोस्टिक सेंटर,डॉ कुलकर्णी यांचे डायग्नोस्टिक सेंटर आणि डॉ मिसाळ यांचे डायग्नोस्टिक सेंटर पैकी फक्त अन् फक्त डॉ मिसाळ यांच्या डायग्नोस्टिक सेंटरचीच चिट्टी देण्यात येते…

विशेषतः सरकारी नियमा नुसार 9 व्या महिन्यातील गरोदर महिलेची सोनोग्राफी हि पुर्ण पणे निशुल्क असते परंतु आता प्रश्न असा पडतो की,सरकारी नियमा नुसार ज्या ज्या डायग्नोस्टिक सेंटर ला सोनोग्राफी चे अधिकार दिलेले आहेत त्या डायग्नोस्टिक सेंटर चं कसं…?

वास्तविक पाहता या डायग्नोस्टिक सेंटर ला महाराष्ट्र सरकार यांच्या नियमा नुसार आरोग्य विभागाने प्रत्येक गरोदर स्त्रिच्या 9 व्या महिन्यातील सोनोग्राफी ला 400/ रुपये अनुदान संबंधित डायग्नोस्टिक सेंटर ला जाहीर केले आहे,तरी देखील आर्थिक बाजूने आपणच कसे मोठे होऊ या आशयाने संबंधित सोनोग्राफी चिठ्ठीवर 500/ ते 600/ रुपये फी आकारण्यात यावे,असे धडधडीत नमूद करतात…

तसे पहायला गेल्यास शासनाची अनुदान असलेली फी 400/ रुपये + 500/ ते 600/ रुपये आकारलेली फी असे एकूण 900/ ते 1000/ रुपये प्रती गरोदर स्त्रियांच्या बाळंत पणाचा फायदा घेऊन शासनाचा व अकलूज परिसरातील गोर गरीब रुग्णांची फसवणूक करून त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच शासनाच्या पैशाची हि एक प्रकारे ते चोरी करत आहेत…

बरेच पेशंन्ट हे आपल्या परिचयाच्या डॉक्टरांच्या सोनोग्राफीची चिट्टी मागतात पण डॉक्टर प्रवीण मिसाळ यांच्याच सोनोग्राफी सेंटरला जाण्याचा आग्रह अकलूज च्या उप जिल्हा रुग्णालयातून केला जात आहे आणि त्याच सेंटर ची चिठी दिली जात आहे,जर त्या सेंटरच्या जागी दुसरीकडून सोनोग्राफी करून आल्यास त्या पेशंन्ट सोबत दुर्वव्यवहार केला जात आहे,असे निदर्शनास आले आहे…

9 व्या महिन्यातील गरोदर मातांसाठी एक सोनोग्राफी फ्री असताना वैयक्तिक स्वतःचे हॉस्पिटल असलेले फक्त मेडिसिन डायग्नोस्टिक सेंटरची चिठ्ठी का दिली जाते,त्याचबरोबर त्या वरती 500 व 600 अशा दोन प्रकारचे रुपये का आकारले जातात या साठी बाळू सुग्रीव कसबे रा. विजयवाडी तालुका :- माळशिरस यांनी वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय,अकलूज ता माळशिरस यांना तक्रारी अर्ज दाखल केला असता या प्रकरणाची सखोल चौकशी साठी एक समिती स्थापन करावी व त्याचा अहवाल द्यावा अशी मागणी केली होती…

यावर एक समिती स्थापन झाली देखील त्याचा अहवाल तयार असताना डॉ मोनिका मिसाळ यांच्या दबावाला घाबरून तो चौकशी अहवाल दिला जात नाही का…? असे तक्रारदाराचे म्हणणे आहे…

डॉ मोनिका मिसाळ व मिसाळ मेडिस्कॅन डायग्नोस्टिक सेंटर वरती तक्रारी अर्ज असताना सुध्दा त्या मिसाळ डायग्नोस्टिक सेंटरचेच बिल एवढ्या जलदगतीने अकलूज उप जिल्हा रुग्णालय येथील ऑफिस क्लार्क घुगे यांनी कोणाचे सांगणे वरून बिले काढली असावीत…? ऑफिस क्लार्क घुगे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली की,आम्ही फक्त मेडिस्कॅन सेंटर चे बिल दिले असुन बाकीच्या प्रश्नांची त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली…

डॉ मोनिका मिसाळ ह्या आठवड्यातील बुधवार ह्या दिवशी उप जिल्हा रुग्णालयात असतात,परंतु त्या मंगळवार या दिवशी कोणत्या अधिकाराने येऊन त्या गरोदर महिलांची तपासणी करतात…? देव जाणे…?

मागील दोन वर्षापासून गरोदर महिलांची अशा प्रकारे फसवणूक होत असताना ही बाब वैद्यकीय अधीक्षक गुडे साहेब,उपजिल्हा रुग्णालय,अकलूज यांचे निदर्शनास आली नाही का..? का हा सर्व प्रकार त्यांचे सूचने नुसारच चालू आहे…? असे अकलूज परिसरातील गोर गरीब जनतेमधून बोलले जात आहे…

संबंधित चौकशीतील अहवाल वैद्यकीय अधीक्षक गुडे साहेब उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांनी पत्रकार परिषद बोलावून तो अहवाल मीडिया समोर जाहीर करावा… असे तक्रारदार बाळू सुग्रीव कसबे रा विजयवाडी यांचे असे म्हणणे आहे…

अकलूज च्या उपजिल्हा रुग्णालया संबंधी अधिक माहिती टाइम्स 9 च्या पुढील पोर्टल मध्ये वाचा…

क्रमशः…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button