बकरी ईद दिवशी कुर्बानी नाही आषाढीमुळे माळीनगर – सवतगव्हाण मुस्लीम बांधवांचा निर्णय

माळीनगर प्रतिनिधी…. रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज मो.9921500780
राज्यात २९ जून रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीची वारी करत मजल-दरमजल करत विठु-माऊलीच्या भेटीसाठी चालत आहेत. पंढरपुरात १० लाख वारकऱ्यांचा मेळा जमणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूरला आषाढीचं मोठं महत्त्व आहे.
मात्र यंदाच त्याच दिवशी बकरी ईद असल्याने
आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी बहुतांश सर्वजण उपवास धरुन विठ्ठल भक्ती साजरी करतात. या दिवशी मांसाहर पूर्णपणे टाळला जातो. मात्र, यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर सवतगव्हाण मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण पाहायला मिळाले आहे. हिंदू धर्माचा आदर करत आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी बकरी ईद बकरा कुर्बानी न देता साजरा करण्याचा निर्णय घेतला.बकरी ईद हा मुस्लीम बांधवांचाही महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो. मात्र, माळीनगर सवतगव्हाण मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या ह्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.



