अल सहारा सोशल ग्रुप या मुस्लिम संघटनेच्या वतीने झाले राष्ट्रीय एकतेचे दर्शन खडकेवाडी येथे वारकऱ्यांना करण्यात आले मोफत अन्नदान

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहर व तालुक्यात सातत्याने गेली कित्येक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अल सहारा सोशल ग्रुपच्या वतीने हिंदू मुस्लिम एकतेचे आगळे वेगळे दर्शन आज खडकेवाडी येथे पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारकऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात करून घडवण्यात आले

सदरचे मोफत अन्नदान अल सहारा सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हाजी समीर शेख उर्फ बावा यांच्या नेतृत्वाखाली सदर मोफत अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बाळूमामा मंदिर समिती खोसापुरी जिल्हा नगर तसेच श्री संत सद्गुरु गणेश नाथ महाराज चिंचोली पाटील नगर याशिवाय श्री साई वज्रेश्वरी वारकरी मंडळ एकरुखे तालुका राहता जिल्हा अहमदनगर या दिंडीतील वारकऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात आले
सदरचा कार्यक्रम खडकेवाडी येथील मनहंस पाणी प्लांट आवारात पार पडला सदरच्या कार्यक्रमाला नगरसेवक संजय सावंत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते संजय शिंदे, दस्तगीर पठाण उर्फ बिल्डर, करमाळा अर्बन बँकेचे माजी संचालक फारूक जमादार, सादिक काझी, जावेद शेख, बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, तसेच पत्रकार अश्फाक सय्यद, अलीम शेख वर्धमान पेटकर पांडुरंग वडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

अल सहारा सोशल ग्रुप हे गेली 15 वर्षापासून वारकऱ्यांना मोफत अन्नदान करून एक आगळे वेगळे माणुसकीचे दर्शन घडवित असून त्यांच्या या उपक्रमाबद्दल हिंदू मुस्लिम एक एकात्मता वाढविण्यासाठी एक प्रकारे मोठ्या प्रमाणात बळ मिळत आहे त्यांच्या या सामाजिक उपक्रम बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे



