महाराष्ट्र

वसई विरार भागातील नागरिकांच्या विद्युत संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी खासदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत घेतली विद्युत अधिकाऱ्यांची बैठक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

खासदार आपल्या दारी ” या कार्यक्रमांतर्गत वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युत विभागातील समस्या सोडविण्यासाठी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांसोबत जनतेची बैठक शुक्रवार दिनांक 23 जून रोजी वसई येथे आयोजित करण्यात आली होती.

.यावेळी आपल्या भाषणात पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित म्हणाले की मी कोणावर टीका करत नाही कोणाविषयी वाईट बोलत नाही माझ्या कामाच्या माध्यमातूनच मी उत्तर देत असतो “यावेळी या कार्यक्रमाला विद्युत वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता वसई विभाग संजय खरांदे ,कार्यकारी अभियंता सुटे माणिकपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव पाटील उपस्थित होते.

या बैठकीत वसई विरार भागातील जनतेने आपल्या विद्युत संदर्भातील समस्या मांडल्या या प्रत्येक समस्येला वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली तसेच महत्त्वाचा विषय म्हणजे ग्रामीण भागात सातत्याने वीज जाते जुने झालेले ट्रान्सफॉर्मर व जुन्या झालेल्या विद्युत वाहिन्या याविषयी जनतेने तक्रारी केल्या तसेच मीटर बिघडल्यावर मीटरची मागणी केल्यावर नवीन मीटर उपलब्ध नाहीत असे विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याकडून उत्तर दिले जाते यावर खासदारांनी त्वरित नवीन मीटर उपलब्ध करून देण्याचे आदेश विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले व आठ दिवसात ज्या ग्राहकांची मीटर बिघडली आहेत त्यांना नवीन मीटर बसून देण्याचे आदेश दिले.

तसेच या विद्युत समस्या बैठक कार्यक्रमात भरमसाठ येणाऱ्या बिलाबाबत चर्चा झाली. विद्युत बिले तपासून करेक्ट करून देण्याचे आश्वासन देखील विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी खासदारांना दिले. जनतेला भेडसावणाऱ्या या ज्वलंत प्रश्नाविषयी बैठक आयोजित केल्यामुळे वसई विरार भागातील जनतेने खासदार गावित यांचे आभार व्यक्त करून पालघर जिल्ह्यातील विविध विभागाच्या ही अशाच बैठका आयोजित कराव्या व विद्युत ग्राहकांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी केली .

यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी वसई विरार
भागातील जनतेला जून संपण्यापूर्वी प्रतीक्षेत असलेले 90 एमएलडी पाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला मिळणार आहे अशी खुशखबर देखील खासदार राजेंद्र गावित यांनी या बैठकीत दिली. खासदार आपल्या दारी या बैठकीला वसई तालुक्यातील वैतरणा ते नायगाव विरार नालासोपारा वसई अशा सर्व भागातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.या कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे वसई जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ विनायक निकम मनोज पाटील, सुरेश चौधरी जितेंद्र शिंदे व अजित खांबे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button