क्रीडा

लवंगच्या फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या बाळगोपाळांनी आंतरराष्ट्रीय योगादिनाचा मनमुराद आनंद लुटला.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

माळशिरस तालुक्यातील लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या मुलांनी विविध योगासने करत आंतरराष्ट्रीय योगदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.या मुलांना शाळेत सोडायला आलेल्या पालक वर्गांनी हि मुलां बरोबर योगासने करून आपला सहभाग नोंदवीला.या स्कूलच्या प्राचार्या नूरजहाँ शेख यांनी स्वतः योगासनाची प्रात्यक्षिक करून लहान मुलांकडून योगासने करून घेतले

२१ जून या दिवशी सर्व जगभर योगदिन साजरा केला जात असताना.ग्रामीण भागातील व खेड्यातील शाळेच्या मुलांनी व लोकांनी योगासने करत योगदिवस साजरा केला.या वेळी योगसनाचे महत्व सांगताना शाळेच्या संचालिका नूरजहाँ फकृद्द्दीन शेख म्हणाल्या की,योागसनाचे महत्व प्रत्येकाने समजले पाहिजे शरीर,फिट निरोगी राहण्यासाठी अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी रोजच्या रोज योगा करणे अत्यंत आवश्यक आहे

योगा केल्याने डायबेटीज,बी.पी.अशा महाभयंकर आजारांना आपण नियंत्रीत ठेवू शकतो,तसेच नियमित प्राणायाम केल्याने फुफुसाची क्रिया उत्तम रित्या चालते रक्तातील ओक्सिजनचे प्रमाण वाढते रक्ताभिसरण क्रिया जलद होते यामुळे ऍलर्जी श्वसानाचे आजार आपन धुडकावून लावू शकतो,ताडासन केल्याने संम्पुर्ण शरीराचे स्नायूना तान पडल्याने लावचिकता अंगी येते लहान मुलाची उंची वाढवण्यासाठी ताडासन अत्यंत गुणकारी,परिणामकारी ठरते धनुरासन केल्याने पाठींच्या मनक्यांना आराम मिळतो मनक्याची होणारी झीज आटोक्यात येते पाटदुखीपासून आराम मिळतो शरीरात उत्साह निर्माण होतो परिणामी मानसिक उत्साह वाढतो तान तनावापासून माणूस मुक्त होतो . निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासने नियमित करणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे आहे.

याप्रसंगी शिक्षिका गुलशन शेख तसेच सचिन जाधव,असलम काझी,शितल भुजबळ,रणजित चव्हाण,महादेव कोळेकर,निलेश वाघ,भिलारे, यांचे सह अनेक पालकांनी योासनाचे महत्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांन समवेत योगासने केली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button