पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक पदी दयानंद गावडे यांची नियुक्ती.. तर एसीबी नवनाथ जगताप यांची मुंबई येथे बदली.
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्युरो ) पालघर पोलीस उपअधीक्षक पदी दयानंद गावडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असून पालघर पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक असताना त्यांनी 2021 ते जून 2023 या कालावधीत ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, महिला पोलीस हवालदार,पोलीस निरीक्षक,वनरक्षक, वनपाल लिपिक,तलाठी, कार्यकारी अभियंता,मुख्याध्यापक,राज्य कर अधिकारी, खाजगी ईसम, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका,भूसंपादन सहाय्यक जिल्हाधिकारी,कारकून,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस शिपाई, सेवानिवृत्त ग्रंथपाल वैद्यकीय अधिकारी,मंडळ अधिकारी, शिक्षण अधिकारी अशा 36 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सापळा रचून दंडात्मक कारवाया केल्या आहेत .
तर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे याआधी रायगड येथे स्थानिक गुन्हे शाखा या विभागात कार्यरत होते. 1996 रोजी महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदापासून त्यांनी पोलीस खात्यात पदार्पण केले आहे. 1997 ते 2009 या कालावधीत त्यांनी मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर रायगड,सोलापूर, पुणे ग्रामीण आणि 21 जून 2023 पर्यंत रायगड स्थानिक गुन्हे शाखेमध्ये ते कार्यरत असताना त्यांनी पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस खात्याने त्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ( अँटी करप्शन ब्युरो ) पालघर पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती केली आहे.पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी गुरुवार दिनांक 22 जून 2023 पासून पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.