इंदापूर येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मानव विकास परिषद यांच्या वतीने नाष्टा व पिण्याचे पाण्याची सोय
उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
आषाढी वारी सन 2023 जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान करत असून पालखीचे आज इंदापूर येथे शहरांमध्ये आगमन झाले असता इंदापूर येथील मानव विकास परिषद इंदापूर टीमच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील किमान 2000 भाविक भक्तांच्या नाष्टा आणि पाण्याची सोय करण्यात आली होती
या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली हे आमचे भाग्यच आहे असे मानव विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव विकास परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव, – इंदापूर पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्य- पोलीस मित्र परिवार महाराष्ट्र महिला राज्य संघटक- रेश्मा शेख ,महाराष्ट्र प्रदेश संघटक निलोफर पठाण ,पुणे जिल्हाध्यक्ष विकास शिंदे ,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष -निर्मला जाधव ,पुणे जिल्हा सचिव -महिपत कदम, तालुका अध्यक्ष -मानवी सोन नीस, तालुका उपाध्यक्ष- मनीषा भांगे तालुका सल्लागार ए डी रेश्मा गार्डे, तालुका संपर्कप्रमुख विद्या सरोदे ,तालुका मार्गदर्शक दक्षता डावरे ,आदि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले