“शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नातेपुते शहरातील बँक कॉलनी मधील रहिवासींच्या पाठीशी”
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
गेली पस्तीस वर्षे बँक कॉलनी परिसरातील लोकांचे होणारे हाल आज पर्यंत त्याला कोण वाली मिळाला च नाही पण आज शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत यांनी प्रभाग क्र ४आणि ५ च्या सीमेवर असणाऱ्या बँक कॉलनी ला भेट देवून लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या लवकरात लवकर बँक कॉलनी मधील रहिवासीयांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवून देवून त्या ठिकाणीं असलेले घाणीच्या साम्राज्यामधून सुटका करून देण्यासाठी शिवसेना तेथील रहिवासी यांच्या दोन पाऊल पुढे राहुन पर्यंत करणार असल्याचे सांगितले
फोन न उचलणारे co, लोकांच्यावरती दमदाटी करणारे ठेकेदार ,काही ठराविक लोकांच्या मनधरणी साठी किंवा ठराविक लोकांच्या सोई साठी करण्यात आलेले तात्पुरते काम.पण या तात्पुरत्या कामा कामातून सामन्या लोकांचे हाल प्रशासन नक्की कोणाची हुजरेगिरी करत आहे?. असा प्रश्न रहिवासीयांना पडत आहे. नातेपुते शहराच्या स्वच्छतेसाठी अमुक निधी तमुक निधी चा बाता इतरवेळी मारल्या जातात पण प्रत्यक्ष तो निधी जातो कुठे?. मिळालेल्या निधीचा आकडा हा फक्त जाहिराती पुरता च वापरला जातो का? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही?
बँक कॉलनीतील रहिवासी यांना गेली ३५ वर्षे हा त्रास कोणासाठी सहन करावा लागला? लोकांचे हाल का केले गेले? याला जबाबदार कोण? शहरात पालखी येणार असूनही त्या गटारात औषध मारले नाही, गटारांची साफ सफाई केली नाही या उलट उताराच्या विरोधात पाईप लाईन टाकून विरुद्ध दिशेला गटाराचे सांड पाणी का सोडले गेले? गटाराचे काम निम्म्यातच का सोडले? हा सर्व प्रकार पाहता कॉलनी मधील लोकांना जाणून बुजून त्रास तर दिला जात नसावा ना? असा प्रश्न उपस्थित होतो
परंतू गटराच आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत शिवसेना बँक कॉलनी मधील लोकांच्या पाठीमागे उभा राहील यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत, तालुका उप प्रमुख अमोल उराडे, युवासेना तालुका उप प्रमुख रुपेश लाळगे, शहर प्रमुख सनी गवळी, संजय उरडे, गणेश बापू उराडे, धनंजय बोराटे, गोविंद माने, युवासेना शहर प्रमुख अक्षय कूचेकर, यांच्या सह कॉलनीतील सर्व रहिवाशी उपस्थित होते