मोदी @ 9 या अभियाना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या “घरोघरी संपर्क” या अभियानाची बैठक संपन्न
उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी @9 या अभियान अंतर्गत घेण्यात येणाऱ्या “घरोघरी संपर्क” अभियाना, संदर्भात बैठक संपन्न झाली ही बैठकविधान परिषदेचे विद्यमान आमदार . रणजीत सिंह मोहिते-पाटील व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शना खाली संपन्न झाली.
सदर बैठकीस पंचायत समिती उपसभापती .प्रतापराव सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष .मुख्तार भाई कोरबु भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस व “घरो घरी जनसंपर्क अभियान “प्रमुख सुरज मस्के, तालुका सरचिटणीस .संदिप घाडगे पाटील, अभियान तालुका सहप्रमुख स्वप्नील शहाणे, अमित पुंज, रोहन पवार व सर्व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमामध्ये घरोघरी जनसंपर्क अभियानाचे पञक सर्व शक्तीकेंद्राना .आमदार .रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.