बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं असतं – दिपक केसरकर, यांचे गौप्यस्फोट

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज 20 जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. हे बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं असतं, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केलाय. दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये पडसाद पडण्याची शक्यता आहे.
त्यांच्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेलं आहे. गद्दार कुणाला म्हणता? मी असा मनुष्य बघितलाय, मी आजपर्यंत मीडियासमोर कधी बोललो नव्हतो. माझे एकनाथ शिंदे यांच्यासोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते समजा रागून निघून गेले होते, तर त्यांनी परत येण्याची तयार दाखवलेली होती”, असं दीपक केसरकर म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. ते सच्चे मनुष्य आहेत. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटलं असतं की मी केलेला हा उठाव यशस्वी होणार नाही तेव्हा मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता आणि म्हणालो असतो की, माझी चूक झालेली आहे. पण यामध्ये या लोकांची चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.



