पालघर माहीम विविध शिक्षण संस्था मिडीयम इंग्लिश स्कूलच्या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेची फी न भरल्यामुळे तिला शाळेत घेण्यास बंदी

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील पालघर माहीम येथील माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेची फी न भरल्यामुळे या शाळेने तिला वर्गात घेण्यास बंदी घातली आहे. ही शाळा पालघर जिल्ह्यातील माहीम येथील असून या विद्यार्थिनीचे नाव प्रियल दिलीप किनी असे असून ती इयत्ता पाचवी मध्ये माहीम येथील माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था मिडीयम इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे.

तिच्या वडिलांनी तिच्या शाळेची फी न भरल्यामुळे मंगळवार दिनांक 20 जून आणि बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी तिचे वडील तिला शाळेत घेऊन गेले असता तिला या शाळेने फी भरल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही अशी सक्त ताकीद देऊन तिला घरी पाठवले आहे.
याबाबत तिच्या वडिलांनी मी येत्या काही दिवसात फी भरतो अशी विनवणी करून देखील या शाळेने व शाळेच्या कमिटीवरील अध्यक्ष,सचिव आणि उपाध्यक्ष तसेच मुख्याध्यापिका यांनी या मुलीच्या वडिलांना शाळेत फी भरल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही अशी सक्त ताकीद दिली आहे.
यामुळे ही मुलगी सध्या गेल्या दोन दिवसापासून आपल्या शिक्षणापासून वंचित असून ती आपल्या वडिलांकडे मला शाळेत का घेत नाही याचा जाब मागत आहे ?????



