महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळे वस्ती येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे हलगी वाजून गेले स्वागत

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती (विहाळ ) येथे पहिल्या च दिवशी मिरवणूकीने हालगी वाजवून विदयार्थ्याचे स्वागत करण्यात आले – मुख्याध्यापक संतोष पोतदार यांनी सांगीतले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती (विहाळ ) ता करमाळा येथे ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी पोपट नाळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विकास मुरलीधर नाळे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र विदयार्थ्याचे हालगी वादन श्री महारुद्र बलभिम बंडगर यांनी करुन विदयार्थ्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली .

गुलाबपुष्प , पुस्तके देवून सर्वच विदयार्थ्याचे स्वागत करण्यात आले . यावेळी पालक , पोपट नाळे भाऊसाहेब नाळे , लक्ष्मण नाळे , सुंदर दास नाळे , भालचंद्र नाळे , गहिनीनाथ नाळे , योगेश नाळे , सविता नाळे , जयश्री नाळे , मुक्ताबाई नाळे , कविता नाळे , अनिता नाळे , अनुसया नाळे , सिंधू बाई नाळे , शोभा देवकते उपस्थित होते . सुत्रसंचलन श्रीम अनुराधा शिंदे यांनी तर प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक संतोष पोतदार यांनी केले . गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील , विस्तार अधिकारी श्री टकले साहेब , केंद्रप्रमुख वैशाली महाजन यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला . तसेच गटविकास मनोज राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सायन्स वॉल उपक्रमांतर्गत वैज्ञानिक शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांची जयंती साजरी करुन माहीती सांगण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button