महाराष्ट्र

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अंथुर्णे मुक्कामी; आमदार दत्तात्रय भरणे यांनी सपत्नीक केली महाआरती…

लवकर पाऊस पडू दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे आमदार भरणेंचे साकडे…

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सणसर येथून निघून, बेलवाडी येथे गोल रिंगण संपन्न झाले. त्यानंतर अंथुर्णे येथे पालखी मुक्कामी पोहचली.

यावेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व सारीका भरणे यांनी अंथुर्णे येथे पालखीचे स्वागत केले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी सपत्नीक महाआरती केली. तसेच पालखीचे ठिकठिकाणी जल्लोषात वैष्णवांचे आदरातिथ्य करण्यात आले. पालखी सोहळ्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. पुरषोत्तम मोरे महाराज तसेच सर्व पालखी सोहळा प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार भरणे यांनी विठुरायाच्या चरणी बळीराजाला सुखी समृद्ध होऊ दे लवकर पाऊस पडू दे असे साकडे घातले.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी झाले असून जगाच्या पाठीवर सर्वात मोठा हा पालखी सोहळा आहे. तसेच पालखीमध्ये लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत तसेच हजारो माता भगिनी विठुरायाच्या ओढीने देहभान विसरून चालत आहेत. त्यांच्या निरागस चेह-यावरील आनंद आणि समाधान पाहून आपले मन सुद्धा ख-या अर्थाने प्रफुल्लित होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वारीमध्ये चालत असताना भागातील अनेक वैष्णवांशी संवाद साधण्याचा योग आला असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

यावेळी पालखी सोहळ्यातील वैष्णवांना भोजन देण्यात आले. तर सोनाई डेअरीच्या वतीने शुध्द पिण्याच्या पाण्याचा टॅकरची सोय करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button