महाराष्ट्र

दसरा व दिवाळी सणासाठी हरभरा डाळीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – शंभू राजे जगताप

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भारत सरकार च्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेड यांच्या वतीने खास दसरा सण व दिवाळी सणा निमीत्त नागरिकांसाठी मागेल त्याला ६० रु . किलो या सवलतीच्या दरात भारत डाळ च्या नावाने एक आधार कार्ड वर ५ किलो हरभरा डाळ विक्री केली जाणार आहे .

तरी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक व खरेदी- विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी केले आहे . आज दि. १२ आक्टोबर रोजी त्यांच्या हस्ते मार्केटयार्ड करमाळा येथे उद्घाटन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते . यावेळीखरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा बाजार समितीचे नुतन संचालक शंभुराजे जगताप महादेव कामटे, मनोज पितळे, विकीशेठ मंडलेचा, विलास जाधव, सोनूशेठ वीर ,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर व सर्व कर्मचारी वृंद, सचिन शिंदे
नाना मोरे पंकज (बापु) वीर आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button