महाराष्ट्र

धाराशिव वार्ता 24 वेब पोर्टल ,यूट्यूब चैनल, ई- पेपर चे आईच्या हस्ते अनावरण

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी

बदलत्या काळात निर्माण होणारी प्रश्न व समस्या लोकांची गरज याचा परिपूर्ण विचाराने युक्त असलेले धाराशिव वार्ता वेब पोर्टल ,यूट्यूब चैनल ,ई – पेपर लोकांच्या अपेक्षाला खरे उतरेल व याचे संपादक सन्मान मुल्ला यांनी ते वेळोवेळी केलेल्या वार्तांकनातून सिद्ध केले आहे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष व पत्रकार बालाजी अडसूळ यांनी संत ज्ञानेश्वर बालक आश्रम कळंब येथे आयोजित धाराशिव वार्ता वेब पोर्टल, यूट्यूब चैनल ई – शानदार अनावरण समारंभात व्यक्त केले..

संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे दिनांक 20 जून रोजी धाराशिव वार्ता वेब पोर्टल युट्युब चॅनेल ,ई – पेपर चे शानदार अनावरण सलमान मुल्ला यांच्या मातोश्री रहेना अब्दुल हमीद मुल्ला यांच्या हस्ते संपन्न झाले..

या कार्यक्रमात धाराशिव वार्ता चे संपादक सलमान मुल्ला वतीने शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. बाळकृष्ण भवर यांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणात सलमान मुल्ला तरुण पत्रकार आहे त्यांनी पत्रकारिता सुरू केल्यापासून – ई पेपर च्या माध्यमातून लेखन सुरू केले आहे त्यांचे लेखन दर्जेदार असू सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे ते काम करीत आहेत या माध्यमातून हे काम अधिक गतीने करतील असा विश्वास व्यक्त करून प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया या समोरील आव्हाने या विषयी आपले विचार व्यक्त केले..

तर कॉम्रेड बजरंग ताटे यांनी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून विस्थापित भटक्या वंचित समाजातील घटकांना पत्रकारांनी न्याय मिळवून देण्यासाठी काम केल्याचे सांगितले ,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करून वेब पोर्टल यूट्यूब चैनल ई- पेपर याचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित केले मंचावर कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे, आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे बंडूभाऊ बनसोडे मानव अधिकार आंदोलनाच्या जिल्हा सचिव माया शिंदे ,महिला कार्यकर्त्या ज्योती सपाटे यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थितात कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य भारत नाना सांगळे, संदीप मस्के, राहुल हौसलमल, बंडू ताटे साप्ताहिक साक्षी पावन ज्योतचे संपादक सुभाष घोडके, रसूल तांबोळी, व्हॉइस ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अमर चोंदे तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे ,विनोद शिंदे ,लहुराज आष्टेकर ,बबलू शेख, राहुलजी मुळे, यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकिब पटेल सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार सलमान मुल्ला यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button