शहर
बावडा येथील अमिन तांबोळी यांचे वृद्धापकाळाने निधन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378876123
बावडा गावातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ अमिन सज्जन तांबोळी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे इंदापूर तालुका अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष मुजमिल तांबोळी यांचे ते वडील होते.
त्यांच्या अंतविधीला समाजाबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, शेती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




