क्राईम

वसई ग्राम महसूल महिला अधिकारी 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या जाळ्यात अटक.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640.

कोर्टामध्ये केस चालू असलेल्या जागेत रूम बांधून माती भराव केल्या बाबतचा पंचनामा न करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांकडे एक लाख 95 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 45 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या वसई महिला ग्राम महसूल अधिकारी यांना सोमवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्यावर पेल्हार वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तलाठी सजा बिलालपाडा पेल्हार वसई येथील तक्रारदार व त्याचा मामा यांनी 2015 रोजी सर्वे क्रमांक 13/03 येथे जमिनी विकत घेतली आहे. त्या जमिनीमध्ये त्यांनी चार रूम बांधून बाकीच्या जमिनीत मातीचा भराव केला आहे. याच जमिनीची कोर्टामध्ये केस चालू आहे तरी देखील त्यांनी या जागेचा वापर करून कायदा हातात घेतला म्हणून त्याचा पंचनामा करून पुढे न पाठवण्यासाठी तलाठी सजा बिलालपाडा पेल्हार वसई ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील वय वर्ष 48 यांनी तक्रारदार यांच्याकडे बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी 45 हजार रुपये व माती भरावाचा पंचनामा न करण्यासाठी एक लाख 50 हजार रुपये अशा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी या महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याची लेखी तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभाग पालघर यांच्याकडे केली होती.

म्हणून या तक्रारीची पडताळणी करून पोलीस अधीक्षक शिवराज पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर लाच लुचपत प्रतिबंध विभाग पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार गीता कहार, जितेंद्र गवळे, योगेश धरणे आकाश लोहारे, प्रकाश दळवी, विलास भोये या पथकाने सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12.51 वाजता सापळा रचून पंचा समक्ष ग्राम महसूल अधिकारी उज्वला पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता 45 हजार रुपयांचा रोख रक्कम स्वीकारताना त्यांच्याच केबिनमध्ये रंगेहात अटक करून त्यांच्यावर वसई पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button