काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात मंगळवेढ्यातून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ

विशेष प्रतिनिधी..रियाज मुलाणी मो 9921500780
भारत जोडो यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी मंगळवेढा तालुक्यात काँग्रेस कार्यालयापासून प्रांत कार्यालया पर्यंत जनसंवाद यात्रा काढण्यात आली जनसंवाद यात्रेच्या उद्घाटना प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी सरकारवर ओढले ताशारे रेल्वे, विमानतळ, आता एसटी, देखील भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे.
काँग्रेसच्या काळात श्रीमंत आणि गरीबाची दरी मिटवण्याचा प्रयत्न केला जात होता भाजप दरी वाढवण्याचे काम करीत आहे सर्वसामान्य जनतेला न्याय घ्यायचा असेल तर काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, ॲड अर्जुनराव पाटील, दिलीप जाधव, तुकाराम कोळी, मारुती वाकडे, अण्णासाहेब इनामदार, अमर सूर्यवंशी, माजी सभापती विष्णु शिंदे, अभिषेक कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष डॉ शाहीन शेख, सुधीर लांडे, मोतीराम चव्हाण, ओ बी सी सेल चे प्रदेशाध्यक्ष तुकाराम कोळी, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राजेंद्र चळेकर, रविकिरण कोळेकर, मनोज माळी, अकबर मुलाणी, पांडुरंग माळी, शिवशंकर कवचाळे, संदीप पवार, आदी उपस्थित होते. आभार जयश्री कवचाळे यांनी मानले.

पाच दिवस चालणार यात्रा
गुरुवार: दामाजी नगर, चोखामेळा नगर,
शनिवार: ढवळस, धर्मगाव, मुढवी, उचेठाण, बठान, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, तांडोर, सिद्धापूर, अरळी, नंदुर,
रविवार: डोनज, भालेवाडी, मरवडे, डिकसळ, बालाजी नगर, कागष्ट, हुलजंती, सोडी, शिवनगी, आसबेवाडी, सलगर बु, लवंगी,
सोमवार: खोमनाळ, हिवरगाव, हाजापूर, भाळवणी, निंबोणी, नंदेश्वर,भोसे, हुन्नूर, महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी,
मंगळवार: पाठखळ, खुपसुंगी, गाणेवाडी, शिरसी, लेडवे, गुंजेगाव, अकोला,



