केंद्रीय दुष्काळी पथकाने केली करमाळा तालुक्यातील चार गावांची पाहणी, खरीपा सह रब्बी हंगाम गेला वाया, सांगा जगायचे कसे, दुष्काळी शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडल्या आपल्या व्यथा

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख
करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्त्री सदस्य समितीच्या पथकाने आज पाहणी केली यामध्ये वरकुटे नेरले घोटी तसेच सालसे परिसरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोमेजलेली पिके कोरड्या पडलेल्या विहिरी नाले तलावाची पाहणी केली यावेळी भीषण दुष्काळी दाहकतेमुळे खरीपा सह रब्बी हंगाम वाया गेल्याने सांगा आम्ही आता कसे जगायचे असे म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा व दुष्काळी परिस्थितीची गंभीर विषमता पथकासमोर बोलून दाखवत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत करावी असे साकडे घातले

यावेळी पथकानेही आम्ही तात्काळ केंद्र सरकारला अहवाल सादर करणार असल्याची माहिती दिली यंदा करमाळा तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे खरीपा सह रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या दुष्काळी पथक यांनी पाहणी दौरा केला

करमाळा तालुक्यातील चार गावातील केंद्रीय दुष्काळी दौऱ्याने हाच पाहणी केली असून तालुक्यातील घोटी वरकुटे नेरले व सालसे या परिसरात सदर पथकाने दुष्काळी पाहणी केली यावेळी दुष्काळाची भयंकर परिस्थितीचे दर्शन त्यांना पहावयास मिळाले या दुष्काळी पाहणे पथकात केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार मुरलीधरण व केंद्र व सार्वजनिक वितरण विभागाचे उपसचिव सरोजनी रावत यांचा समावेश होता सदरच्या पथकाने तालुक्यातील घोटी, नेरले, वरकुटे व सालसे या ठिकाणी पाहणी केली

या पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान जनावराच्या पिण्याचे पाण्याची तसेच चाऱ्यांची अडचण यावेळी ग्रामस्थांनी पथकाला सांगितले सदर पाहणे मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत शेतकऱ्यांच्या बांधावर पथकाने हजेरी लावली यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार शिल्पा ठोकडे गटविकास अधिकारी देविदास सारंगकर कृषी अधिकारी संजय वाकडे आदि सह इतर अधिकारी उपस्थित होते



