गांधी चौक ते जयसिंग चौक (अशोका चौक) रस्त्याचे काम मार्गी लागणार….महेश शिंदे यांनीही सतत केला होता पाठपुरावा …

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलुज मधील जयसिंहचौक-गांधीचौक हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून ना दुरुस्ती होता. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे वातुकीला अडचण निर्माण होत होती. या रस्त्यावर जाताना जीव मोठे धरून जावा लागत होता. हेच लक्षात घेऊन मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने गेली दीड ते दोन वर्ष मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आहे.
या रस्त्या संदर्भात सामाजिक संघटनांनी बांधकाम विभाग यांचेकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु हा रस्ता आमच्या अख्त्यारीत नाही. नॅशनल हायवे कडे आहे.असे सांगून दुर्लक्ष केले जात होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरला त्यामध्ये महेश शिंदे अमोल माने किरण साठे व इतर प्रस्थापित मंडळी यांच्या मुळे अखेर प्रश्न मार्गी लागला आहे. आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे माध्यमातुन मुंबई मंत्रालय येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव. साळुंखे साहेब, चिफ इंजिनीअर अतुल चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता, तसेच नॅशनल हायवे चे नारायणकर यांचे प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नांसंबधी बैठक पार पडली.
यावेळी अकलुज मधील जयसिंहचौक-गांधीचौक हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात येवुन या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सुचना संबधित अधिकार्यांना देण्यात आल्या. प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील मॅडम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे वर्ग करण्यात आल्यामुळे हा रस्ता लवकरच दुरुस्त होणार असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.



