क्राईम

अनधिकृत बांधकाम साईट सुपरवायझर वर कारवाई न करण्यासाठी.. 2 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना.. भिवंडी सर्वेअर तथा निरीक्षक सुरेंद्र भोईर ठाणे एसीबीच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

साईट सुपरवायझरने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 2 लाख 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारल्या प्रकरणी सुरेंद्र भास्कर भोईर वय वर्ष (52) सर्वेअर तथा इमारत निरीक्षक अतिरिक्त कारभार सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती क्रमांक 03 पद्मानगर भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिका ठाणे यांना लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या पथकाने मंगळवार दिनांक 9 जून रोजी संध्याकाळी सात वाजता सापळा रचून पंचा समक्ष अटक करून त्यांच्यावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी भागात साईट सुपरवायझर (तक्रारदार) यांचे बांधकाम व्यवसायाचे काम चालू आहे.

हे बांधकाम साईट सुपरवायझरने अनधिकृत पणे परवानगी न घेता चालू केले आहे. म्हणून साईट सुपरवायझरवर कारवाई न करण्यासाठी सुरेंद्र भोईर सर्वेअर तथा निरीक्षक आयुक्त यांनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.याबाबत साईट सुपरवायझर यांनी सुरेंद्र भोईर सर्वेअर तथा निरीक्षक यांची लेखी तक्रार 9 जून रोजी ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभाग कार्यालयात केली होती.

या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन विभाग ठाणे पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या पथकाने मंगळवार दिनांक 9 जून रोजी सापळा रचून पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून सुरेंद्र भोईर यांनी जोशी हॉस्पिटल भिवंडी प्रभाग क्रमांक 03 कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत हुंडाई क्रेटा गाडी क्रमांक एम एच – 01-DK 6085 या खाजगी गाडीत बसून लाचेचा अडीच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्यावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई शिवराज पाटील पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे परिक्षेत्र, व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे लाच लुचपक प्रतिबंध विभाग ठाणे परिक्षेत्र , अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन विभाग ठाणे पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button