महाराष्ट्र

तांदुळवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी राहुल उघडे तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय चव्हाण यांची बिनविरोध निवड.

लक्ष्मीकांत कुरुडकर. अकलूज(प्रतिनिधी)

तांदुळवाडी तालुका माळशिरस येथील तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड आज झाली.

यावेळी प्रस्ताविक माजी चेअरमन उदयसिंह राजगुडे यांनी करून ते म्हणाले की संस्थेची गतवर्षाचे कर्ज वाटप रक्कम ३ कोटी वरून ६ कोटी वर गेले आहे व नवीन १०० सभासदांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. याबद्दल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आभार व्यक्त केले ते पुढे म्हणाले की चालू वर्ष संस्था १०० टक्के बँक कर्ज फेडणार आहे असे सांगितले.

यावेळी निवडणुका अधिकारी जाधव यांच्याकडे चेअरमन पदासाठी व व्हाईस चेअरमन पदासाठी एक एकच अर्ज आल्याने तांदुळवाडी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रोहित उघडे व व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय चव्हाण यांची निवड निवडणूक अधिकारी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी नूतन चेअरमन राहुल उघडे यांचा सत्कार उदयसिंह राजगुडे यांच्या हस्ते करण्यात आला तर नूतन व्हाईस चेअरमन दत्तू चव्हाण यांचा सत्कार गणपत गुजरे यांच्या हस्ते करण्यात आला तर माजी चेअरमन उदयसिंह राजगुडे यांचा सत्कार विश्वंभर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तर माजी व्हाईस चेअरमन गणपत गुजरे यांचा सत्कार दशरथ मिले यांच्या हस्ते करण्यात आला.

निवडीच्या कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक दशरथ मिले, चंद्रकांत डोके, विश्वंभर चव्हाण, शहाजी लोखंडे, धनाजी चव्हाण, नानासो कदम, गयाबाई करांडे, तसेच तांदुळवाडी विकास आघाडीचे ज्ञानेश्वर उघडे,रामकृष्ण चव्हाण, माजी उपसरपंच शशिकांत कदम, माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश कदम, कैलास काकडे, रोहित काकडे , तेजस जाधव रोहित उघडे सोसायटीचे सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

गतवर्ष निवडणुकीत तांदुळवाडी विकास आघाडीचे १३ पैकी १३ संचालक प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाचा १ वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने निवडणुक जाहीर झाली होती. तांदुळवाडी विकास आघाडीच्या प्रत्येक संचालकाला चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची संधी मिळणार आहे, प्रत्येकाला काम करण्याची संस्थेवर संधी मिळणार आहे.

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व विभागाचे कर्मचारी यांनी पार पाडले तर शेवटी संस्थेचे सचिव मारुती मोकळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button