महाराष्ट्र

किरण धाईंजे रिपब्लिकन पक्षातील आक्रमक चेहरा

बी टी शिवशरण

नुकतीच किरण धाईंजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पदी निवड केली आहे
धाईंजे यांच्या निवडीने माळशिरस तालुक्यात उत्साह चैतन्य आनंद कार्यकर्त्यात संचारला आहे किरण हे अजातशत्रू व्यक्तिमत्व स्वभाव असलेले एक संयमी नेतृत्व आहेत सतत कार्यकर्त्यात समाजात मिसळून प्रत्येकाच्या अडचणी समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देणारे धडपडणारे ते कार्यकर्ते आहेत प्रदेश्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे ते कट्टर समर्थक खंदे म्हणून ओळखले जातात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची धुरा ते गेली पंधरा वर्षे आपल्या सशक्त खांद्यावर संभाळताना दिसतात रिपब्लिकन पक्षाचे ध्येय धोरण भूमिका विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याकामी ते पूर्णवेळ सक्रिय आहेत

रिपब्लिकन पक्षाचा ते आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात किरण धाईंजे यांच्या निवडीने पक्ष्यातील कार्यकर्त्यांना नवीन उभारी बळ मिळाले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही आंबेडकरी विचाराचा हा शिलेदार सामाजिक समता न्याय स्वातंत्र्य लढ्यासाठी कार्यरत राहील यात संदेह नाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे नेतृत्व विश्वास यावर लाखो तरुण फिदा आहेत निळा झेंडा जयभिमचा नारा आणि रामदास आठवले यांचे नेतृत्व ही महाराष्ट्रातील आंबेडकरी तरुणांची गतिमान कामाची पद्धत राहिली आहे किरण धाईंजे यांचा अनेक समाजात कार्यकर्त्यात नेत्यात चांगली उठबस आहे सर्व घटकातील माध्यमानशी सलोखा आहे केवळ महार समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे न पहाता सर्व समाजातील युवक रिपब्लिकन पक्ष आठवले गटात कसे येतील व त्यांना त्यात सामावून कसे घेता येईल ही जबाबदारी नूतन युवक महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण धाईंजे यांचेवर आहे त्यांना शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button