शहर

पालघर जिल्ह्यातील मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायती तर्फे हळदी कुंकू व शिक्षकांचा सत्कार

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायत तर्फे या ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी हलदी कुंकू व शिक्षकांचा गुण गौरव समारंभ सोहळा बुधवारी ग्रुप ग्रामपंचायत मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.

यावेळी या समारंभाला या गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी या गावातील बाल शाळकरी कलाकारांनी समूहगीत व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महिलांना संदेश दिला तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पाटील यांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धारकरी असे प्रतिपादन केले.

यावेळी या कार्यक्रमाला त्रिमूर्ती विद्यालय माकणे मुख्याध्यापक जगदीश किणी, भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील, केंद्रप्रमुख गीता किणी,ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी देसाई, ग्रामसेवक प्रतीक्षा पाटील व गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button