महाराष्ट्र

सफाळे विटी लाईन चिखलपाडा स्टॉप वर दोन सख्ख्या भावांचा अपघात…

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे विटी लाईन या रस्त्यावरील चिखलपाडा स्टॉपवर जलसार गावातील दोन सख्खे भाऊ दुचाकी वर बसून सफाळे रेल्वे स्टेशन कडे जात असताना त्यांचा मंगळवारी पहाटे अपघात झाला.या अपघातात हे दोन्ही सख्खे भाऊ जखमी झाले असून त्यांच्यावर सफाळे येथील पार्थ या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

जलसार गावातील सचिन प्रकाश भोईर वय वर्ष (27)व पंकज प्रकाश भोईर वय वर्ष (31) हे दोन सख्खे भाऊ मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी सकाळी 5 वाजता आपल्या जलसार येथील गावातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना हे दोघे आपली निळ्या पांढऱ्या रंगाची MH48-0126 ही मोटर सायकल चिखलपाडा स्टॉप वर घेऊन आल्यावर त्यांचा अपघात झाला या अपघातात सचिन भोईर यांच्या डोळ्याला तर पंकज भोईर याच्या हाताला व डोक्याला जबरी मार लागला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी त्वरित सफाळे येथील पार्थ या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button