दत्तात्रय विठोबा जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
उजनी ता.माढा जि. सोलापूर येथील दत्तात्रय विठोबा जाधव यांचे गुरुवार दिनांक 8 जून 2023 रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समय ते 72 वर्षांची होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा परिवार असून त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या शेतात करण्यात आला

दिनांक 10 जून 2023 रोजी यांचा (तिसरा सावडण्याचा) रक्षाविसर्जन चा दिवस होता
मात्र कै दत्तात्रय जाधव यांच्या कुटुंबीयांनी निर्धार केला की हे रक्षाविसर्जन इतरत्र कोठेही न करता आपल्या शेतात वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या बुडाशी रक्षा विसर्जित करण्यात आले या वृक्षाच्या माध्यमातून वडिलांची आयुष्यभर कायम आठवण राहील. हा निर्धार करुन जाधव कुटुंबीयांनी वृक्षारोपण मागचे भावना व्यक्त केली याप्रसंगी कै.दत्तात्रय जाधव यांच्या पत्नी मुलगा मुली सुना नातवंडे यांच्या हस्ते ही रक्षा विसर्जित करण्यात आली



